Chikkodi

नेज येथे आमदार आणि माजी खासदारांच्या प्रयत्नाने तलाव भरणी

Share

न उन्हाळा आणि उन्हाळ्यात सतावणारी पाणी टंचाई… उन्हाच्या चटक्यांनी अंगाची होणारी लाही आणि अशातच पाण्याच्या टंचाईमुळे अधिकच समस्येत भर पडते. चिकोडी भागातील नेज गावात देखील पाण्याची टंचाई निर्माण झाली असून याचा सर्वाधिक फटका जनावरे आणि शेतकऱ्यांना बसत आहे. परंतु या समस्येपासून चिकोडीयेथील आमदार आणि माजी खासदार यांच्या प्रयत्नातून पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.

होय… ऐन उन्हाळ्यात आमदार गणेश हुक्केरी आणि माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून नेज या गावातील तलाव भरणी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोरड्या पडलेल्या तलावात ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्याने या भागातील नागरिकांची समस्या मार्गी लागली आहे.

गेल्या अनेक वर्षांनंतर नेज येथील हा तलाव भरला आहे. या भागात उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे जनावरांसाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. शिवाय पिण्याच्या पाण्याचीही समस्या आवासून उभी होती. अशा परिस्थिती आमदार गणेश हुक्केरी आणि माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून कृष्णा नदीतून पाइपलाइनद्वारे तलाव भरणी करण्यात आली आहे.

कल्लोळ गावातील कृष्णा नदी पात्रापासून नेज पर्यंत सुमारे २४ किलोमीटर पर्यंत ६ फुटी पाईपलाईन घालण्यात आली आहे. या पाइपलाइनच्या माध्यमातून नेज तलाव भरणी करण्यात येत आहे. आमदार आणि माजी खासदारांच्या या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. सदर योजनेच्या आणखीन सुधारणेसाठी २० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दिला आहे.

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नेज भागात उद्भवत असलेल्या पाणीप्रश्नावर आमदार गणेश हुक्केरी आणि माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या तलाव भरणी उपक्रमामुळे त्यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जात आहे.

आपली मराठीसाठी, डी के उप्पार, इन न्यूज नेटवर्क, चिकोडी

Tags: