बेळगांव शहर आणि उपनगरात साजरा होणाऱ्या शिव जयंती उत्सवाला मोठा इतिहास असून शहरात निघणारी चित्ररथ मिरवणूक संपुर्ण महाराष्ट्र व देशभरात प्रसिद्ध आहे.

तसेच महाराष्ट्र व काही भागात तारीख व तिथी प्रमाणे शिव जयंती साजरी होेत असली तरी बेळगाव शहर आणि परिसरात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला होता. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून देखावे सादर करण्याची तयारी मोठ्या प्रमाणात केली जात असून ४ मे रोजी चित्ररथ मिरवणूक निघणार आहे.
बेळगाव शहर परिसरात १०० हुन अधीक शिवजयंती उत्सव मंडळे आहेत. या सर्व मंडळांकडून गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू झाली आहे तसेच यावर्षी कोणता देखावा सादर करावा त्याचे नियोजन करण्यात आले असून दोन वर्षानंतर मिरवणूक होणार असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग वाढली असून देखावा सादर करण्यासाठी आवश्यक असलेले वाहन कपडे व इतर प्रकारच्या वस्तूंची जमवाजमव सुरू झाली आहे.


Recent Comments