Belagavi

होन्नीहाळ ग्रामदेवी यात्रा उत्साहात

Share

बेळगाव तालुक्यातील होन्नीहाळ या गावात महालक्ष्मी देवीच्या गदगेचे उद्घाटन आणि ओटी भरणे कार्यक्रम पार पडला.

होन्नीहाळ गावातील श्री महालक्ष्मी देवीची विशेष पूजा, धार्मिक कार्यक्रम देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. ओटी भरणे, पडली भरणे अशा धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. भक्तांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभाग घेत देवीचे दर्शन घेतले. संपूर्ण गावात जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घरासमोर रांगोळ्या आणि आकर्षक सजावटीने गाव सजला होता. यावेळी गावातील प्रमुख मार्गांवरून पालखी मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव बोलताना म्हणाले, गावातील नेते आणि ग्रामस्थांच्या सहयोगाने देवीच्या उत्सवाचे उत्तम आयोजन केले आहे. ओटी भरणे, पडली भरणे, नूतन गदगेची स्थापना करणे यासह अनेक धार्मिक कार्यक्रमाम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले आहेत. या उत्सवासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आपण मनापासून आभार मानत असल्याचे जाधव म्हणाले.

यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, धनंजय जाधव, चंद्रकांत केंगेरी, महादेव तळवार, गजान जाधव, शहाजी जाधव, गुंडू तळवार, बसवंत केंगेरी, प्रकाश कड्यागोळ, गणपती सुळगेकर आदींसह अनेकांनी परिशम घेतले.

Tags: