Banglore

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारत विश्वगुरू बनेल : गृहमंत्री

Share

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारत विश्वगुरू बनेल, आणि याचसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण घेतला असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली.

बेंगळूर येथे नृपतुंगा विद्यापीठ परिसरात नृपतुंगा विद्यापीठ आणि शिक्षण विभागाच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. संत बसवेश्वर महारांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना अमित शहा म्हणाले, बसवराज बोम्मई हे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून परिचित आहेत. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून या वर्षी विद्यापीठाचे उद्घाटन होणे हि आनंदाची बाब असल्याचे अमित शहा म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालय, विद्यापीठ, आयआयटी अशा अनेक चांगल्या गोष्टींची स्थापना भाजप नेतृत्वाखाली मोदी सरकार करत आहे. देशात २३० हुन अधिक विद्यापीठे आपल्या सरकारच्या काळात स्थापन करण्यात आली असून पंतप्रधान प्रत्येक विभागाकडे कटाक्षाने लक्ष पुरवीत असल्याचे ते म्हणाले. शहा पुढे म्हणाले, आज अक्षय त्रितीयेचा दिवस आहे. या पवित्र दिनी देशातील शेतकरी नव्या पर्वाला सुरुवात करतात. याचप्रमाणे आज संत बसवेश्वर जयंती देखील असून आजच्या तरुण पिढीने संत बसवेश्वरांसारख्या महान व्यक्तींचे आदर्श आणि तत्वे आपल्या जीवनात बाळ्गावेत असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, देशात नवे शैक्षणिक धोरण जारी करण्यात येत आहे. केजी ते पीजी यात शैक्षणिक बदल होणार आहेत. या बदलांना विरोध होणे हि साहजिक बाब आहे. परंतु काळ कोणासाठी थांबत नाही. नवे शैक्षणिक धोरण समजून घेऊन स्वीकारणारे हे नवे विद्यापीठ स्थापन झाले असून, शिक्षण, रोजगार, सक्षमीकरण या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री बोम्मई, केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र, उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, खासदार पी सी मोहन, डीजीपी प्रवीण सूद आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: