Belagavi

श्री कपिलेश्वर मंदिरात आंब्यांची आरास

Share

 बेळगावातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिरात आज अक्षय्य तृतीयेनिमित्त कपिलनाथाची आंब्यांची विशेष पूजा बांधण्यात आली होती.

होय, बेळगावातील कपिलेश्वर मंदिरात प्रत्येक सण-उत्सवाला कपिलनाथाची कोणत्या ना कोणत्या विशेष रूपात पूजा बांधण्यात येते. त्याचप्रमाणे आज अक्षय्य तृतीयेनिमित्त कपिलनाथाची आंब्यांची विशेष पूजा बांधण्यात आली होती. अनेक आंब्यांपासून कपिलनाथाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासाठी  राजू देवर, सचिन, राजू पाटील यांनी परिश्रम घेतले.

नागराज कट्टी यांनी पौराहित्य केले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: