शिवरायांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेल्या अनेक शिवभक्तांची उदाहरणे आपण पहात आलो आहोत तनामनात स्फूर्ती आणि शिवरायांच्या भक्तीने संचारलेल्या बेळगाव मधील शिवभक्तांनी आपल्या घरावर शिवरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तसेच परंपरेप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर नगर गाडे मार्ग वडगाव येथील भूषण रमेश पाटील आणि संदीप रमेश पाटील या दोन्ही भावंडांनी शिवरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना गगनचुंबी इमारती वर केली आहे.
परिसरातील पंच आणि मान्यवर तसेच शिवभक्तांच्या उपस्थितीत शिव मूर्तीचे अनावरण करण्यात आले.सदर शिवमुर्ती आसपास परिसरातून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरूनही सहजपणे दिसू शकेल इतक्या उंचीवर या शिवमुर्ती ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
शिवभक्ती ने भारलेल्या या दोन्ही भावंडांनी शिवरायांप्रती असलेला आदर अशा अनोख्या पद्धतीने व्यक्त केल्याने सर्व शिवभक्तातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


Recent Comments