हुक्केरी शहरात रमजान सण मोठ्या उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजाच्या अकरा जमात सदस्यांनी सामूहिक नमाज पठण केले.

श्रद्धेने गेला महिनाभर रोजा म्हणजेच उपवास करून रमजान सण साजरा केला जातो. उपवासाच्या माध्यमातून मानसिक शांतता, शुद्धता, सहिष्णुता, सहानुभूती, शिस्त, संयम या गोष्टी आपल्या जीवनात अंगिकारल्या जातात. गरिबांना जकात स्वरूपात सहाय्य्य करण्याचा संदेश महम्मद पैगंबरांनी दिला असून या संदेशानुसार मुस्लिम बांधव रमजान सण साजरा करतात.
रमजानच्या औचित्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना हुक्केरी तालुका जमाती उलेमा हिंद चे अध्यक्ष मौलाना अफरज म्हणाले, हिंदू मुल्सिम बांधव सलोख्याने सर्व सण याठिकाणी साजरे करतात. सर्व सण सर्वधर्मसमभावनेने साजरे करून बलशाली भारत बनवू असा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.
नमाज पठणानंतर मिठाई वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सलीम नदाफ बोलताना म्हणाले, हुक्केरी शहरात शिव-बसव जयंती आणि रमजान हे सण हिंदू मुस्लिम बांधव उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरे करतात. यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
यावेळी अकरा जमात सदस्य बाबामिया खाजी, इर्शाद मोकाशी, अहंमद बागवान, सर्फराज मकानदार, केसर मोकाशी, नासीर सुतार, मुसा नदाफ, फारूक मुल्ला, डीआर खाजी आणि अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.


Recent Comments