इन न्यूजच्या ‘आपली मराठी‘च्या दर्शकांसाठी एक खुशखबर ! उद्या, बुधवारी सायंकाळी ७ वाजता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या भव्य चित्ररथ मिरवणुकीचे इन न्यूजतर्फे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्याचा आनंद तुम्ही घरबसल्या थेट पाहून घेऊ शकता.

श्री शिवजयंती-२०२२ ची मिरवणूक उद्या सायंकाळी ७ वाजता छत्रपती धर्मवीर संभाजी चौकातून सुरु होणार आहे. येथून या मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण चॅनेल नं. १०१ आणि १०५ वर पाहता येईल. इन न्यूजवर उद्या दुपारचे न्यूज बुलेटिन नेहमीप्रमाणे प्रसारित करण्यात येईल. सायंकाळी प्रसारित केले जाणारे न्यूज बुलेटिन प्रसारित होणार नाही.
कोरोनामुळे गेली २ वर्षे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली होती. कुठलीही भव्य मिरवणूक काढता आली नव्हती. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने सरकारने मिरवणुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदाची शिवजयंती मिरवणूक भव्यदिव्य होणार आहे.


Recent Comments