पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यापूवी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी बदल होईल, मंत्री मंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठी महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे, असा धक्कादायक खुलासा विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यांनी केलाय.

राज्याच्या राजकारणाचे वारे उलट सुलट वाहत असल्याचे दिसून येत असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकारण रंगण्याऐवजी सत्ताधारी गटातच राजकारण चालल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात विजापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी नवा गौप्यस्फोट केला असून राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्री बदलासंदर्भात भाजप पक्षश्रेष्ठी आणि हायकमांड विचार करत असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात आपल्याला माहिती उपलब्ध झाली असून पक्षाच्या आणि राज्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान योग्य निर्णय घेतील, असा विश्वास बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी व्यक्त केलाय.
निवडणुकीच्या तयारीसाठी अमित शहा कर्नाटक दौऱ्यावर आले असून वरिष्ठांशी चर्चा करून आगामी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्र्चनेसंदर्भात काही आरोप करण्यात येत असून यामुळे पक्ष मागे हटत आहे. योग्य यावर विचार विनिमय करून हे सर्व रोखण्यासाठी हायकमांड राज्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी विषेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी पक्षासंदर्भात योग्य निर्णय घेतील, असा विश्वास यत्नाळांनी व्यक्त केलाय.
मुख्यमंत्री बदलासंदर्भात काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला प्रत्त्युत्तर देताना यत्नाळ म्हणाले, दुसरी व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यास या दोघांनाही जेलमध्ये जावे लागेल, याची त्यांना भीती आहे, यासाठी अशा पद्धतीने ते विधान करत असल्याची टीका यत्नाळांनी केली. ()
कर्नाटकात सामूहिक नेतृत्व आणायचे असल्यास एकट्या येडियुरप्पांनी किंवा एकट्या जगदीश शेट्टरयांनी किंवा एकट्या यत्नाळांनी काही होणार नाही. यासाठी सर्वांनी एकजूट, एकसंघ राहणे आवश्यक असून यामुळेच १५० जागांवर विजय मिळविणे शक्य असल्याचे ते म्हणाले. आपण सत्तेवर आल्यावर काय करू शकेन याची आश्वासने देणे योग्य नसल्याचेही मत आमदारांनी व्यक्त केले. ()
राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा आणि कुजबुज ऐकू येत असतानाच अचानक आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलेल्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात बदल होईल का?खरंच पंतप्रधान अशापद्धतीच्या निर्णयासाठी पुढाकार घेतील का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.


Recent Comments