बेळगाव शहरात मुस्लिम बांधवाकडून रमजान ईद मोठ्या श्रद्धा–भक्तिने साजरी करण्यात आली.

होय, गेल्या दोन वर्षांपासून महामारी कोरोनामुळे सरकारच्या आदेशानुसार रमजान ईदच्या दिवशी सामूहिक नमाज अदा करण्यास परवानगी दिलेली नव्हती. पण या वर्षी कोविडचा कहर कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी रमजानची सामूहिक नमाज अदा केली.
महिनाभर रोजे पाळून उपवास करून आज देशभरात ईद साजरी करण्यात येत आहे. बेळगावतही अंजुमन इस्लाम संस्थेच्या ईदगाह मैदानावर मंगळवारी सकाळी शहर-परिसरातून जमलेल्या मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली. नवीन कपडे, टोप्या घालून मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव जमा झाले होते.
यावेळी बोलताना मुफ्ती अब्दुल काजी म्हणाले, रमजानच्या निमित्ताने देशात सुख, शांती नांदू दे अशी प्रार्थना आम्ही सर्वांनी अल्लाहकडे केली आहे. २ वर्षे कोरोनामुळे सर्वांना त्रास झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे प्रत्येकाने बंधुभावाने, सौहार्दाने रहावे. कुठलाही धर्म सूर्य धर्माला वाईट म्हणत नाही. सर्व धर्म चांगली शिकवणच देतात. त्यामुळे कोणी काही म्हटले तरी त्याकडे लक्ष देऊ नका. विविधतेत एकता ही देशाची परंपरा सुरु ठेवा असे आवाहन त्यांनी केले.
सामूहिक नमाज अदा केल्यानंतर आबालवृद्धांनी एकमेकाला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.


Recent Comments