जगज्योती बसवेश्वर जयंतीनिमित्त कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

आज श्री बसवण्णा जयंती आणि अक्षय्य तृतीयेनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आ. श्रीमंत पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बैलजोडीची पूजा करून त्यांना गोडधोड भरवून बसवज्योत मिरवणुकीला चालना दिली. त्यानंतर बसवेश्वर चौकातील बसवेश्वरांच्या पुतळ्याचे पूजन करून नमन केले. 
यावेळी आ. श्रीमंत पाटील यांनी बसवेश्वर देवस्थानला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी यांच्याहस्ते बसव युवक मंडळाला श्रीमंत पाटील फौंडेशनतर्फे साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. यावेळी बसवजयंती उत्सव मंडळातर्फे आ. श्रीमंत पाटील यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. फ्लो
यावेळी कागवाड तालुका प्रशासनातील अधिकारी, विविध गावचे नेते, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments