आगामी विधान परिषद निवडणूक २०२३ साली होणार आहे. या निवडणुकीला अद्याप एक वर्षांचा अवधी शिल्लक असून आतापासून राजकीय वारे वाहू लागले आहे. विजापूर जिल्ह्यातील इंडी मतदार संघात निवडणुकीच्या तोंडावर दोन आजी माजी आमदारांमध्ये वाक्युद्ध सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. साखर कारखान्यावरून उभय आमदारांमध्ये वाद सुरु असून माजी आमदारांनी आपल्यावरील आरोप सिद्ध झाल्यास राजकीय सन्यास घेण्याची घोषणा केली आहे.

विजापूर जिल्ह्यातील इंडी मतदार संघातील आमदार यशवंतरायगौंड पाटील आणि माजी आमदार विकांत पाटील यांच्यात हे वाकयुद्ध सुरु झाले आहे. इंडी आमदार यशवंतरायगौडा पाटील हे भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. भीमाशंकर साखर कारखाना हा सहकारी साखर कारखाना आहे.
अवकाळी पावसामुळे कारखान्यातील ६५ हजार साखर पोत्यांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. परंतु हि माहिती खोटी असून साखर कारखान्याचे नुकसान झाले आहे कि नाही हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्यात घेऊन जाण्यात येईल, शिवाय साखर कारखान्यात अनेक घोटाळे झाले असून संगणक खर्चासाठी ४० लाखांचा खर्च दाखविण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भीमाशंकर साखर कारखान्यात झालेल्या घोटाळ्याची चौकशी आणि तपास व्हावा, असा आग्रह करण्यात येणार असल्याची माहिती रविकांत पाटील यांनी दिली.
माजी आमदारांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना आमदार यशवंतरायगौंड पाटील म्हणाले, रविकांत पाटील यांनी केलेले आरोप हे खोटे आहेत. याप्रकरणी रविकांत पाटील यांना नोटीस देण्यात आली असून त्या नोटिसीला त्यांनी उत्तर देणे अपरिहार्य आहे. अन्यथा त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकण्यात येईल. माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास आपण राजकीय सन्यास घेऊ, असेही यशवंतरायगौंड यांनी स्पष्ट केले.
विजापूर जिल्ह्यातील या दोन आजी माजी आमदारांमध्ये रंगलेल्या वाकयुद्धाची चर्चा आता सर्वत्र होत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडात आहेत. साखर कारखान्यात घोटाळा झाला आहे कि नाही, याची चौकशी होणे आणि सत्य उघडकीस येणे आवश्यक आहे.


Recent Comments