बेळगाव शहरात शिव जयंतीचा प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जयंती मुळे बेळगावकरांचा उत्साह शिगेला पोहोचला असून सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले आहे.
बेळगाव शहर आणि परिसरातील शिवजयंती उत्सव मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज आगमन सोहळा अगदी एका सणासारखे साजरे करीत आहेत. शिवरायांच्या जयंतीचा सोहळा कुठल्या सण, उत्सवापेक्षा कमी नाही . बेळगावात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकताच अबालवृद्धात उत्साह दिसून येते . अबालवृद्ध वाजत – गाजत, नृत्य करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची मिरवणूक काढण्यात येत आहे .
आज सकाळी आणखी एक विशेष पाहायला मिळाले . छत्रपती शिवाजी उध्यान येथे आज सकाळी महाराजांची आरती चालू असताना ,एक वानर सुद्धा एकाग्रतेने शिवरायांच्या पुतळ्याकडे टक लावून पाहताना दिसून आले .



Recent Comments