Banglore

दिनदलितांचा सर्वांगीण विकास हेच आपापले ध्येय!

Share

दिनदलितांचा सर्वांगीण विकास, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत कार्य करणे आणि प्रत्येकाने स्वाभिमानाने जीवन जगणे हे महत्वाचे आहे, यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले.

बेंगळुरू विधान सौध येथील बँक्वेट हॉल मध्ये समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कल्याण मित्र साहाय्य वाणी तसेच विभागीय अधिकाऱ्यांसाठी करियर विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात कायदे अस्तित्वात आहेत, कायद्यानुसार पुढे जाण्यास हरकत काय आहे. योग्य काम केल्यास कर्नाटकातील दीनदलित जनता आनंदी होईल. त्यांच्या आकांक्षा वाढतील. सत्तेचा वापर हा जनतेच्या हितासाठी करणे गरजेचे आहे, असे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले.

सरकारी कार्यक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी क्षमता आणि वचनबद्धता आवश्यक आहे. लोककल्याणासाठी सरकारच्या योजना समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि जीवनाचा दर्जा उंचावला पाहिजे हे लक्षात घेण्याची क्षमता या विभागाकडे असली पाहिजे. यासह सामाजिक बांधिलकी जपणेही तितकेच महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

एससीएसटी समाजातील जनतेसाठी पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या पाहिजे. आर्थिक सक्षम बनविण्यासाठी बँकेत व्यवस्था करण्यात येत असून एससीएसपी-टीए योजनेसाठी २८ लाख रुपये देण्यात आले आहेत. ७५ युनिट वीज मोफत देण्यात येत आहे. जमीन खरेदीसाठी २० लाख, एससीएसटी युवकांना स्वयंरोजगाराची व्यवस्था, गृहनिर्माणासाठी २ लाख रुपये अशा अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ()

या कार्यक्रमास सभापती बसवराज होरट्टी, समाज कल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, आमदार एन रवीकुमार, ए नारायणस्वामी, अ. देवेगौडा, आंबेडकर विकास महामंडळाचे अध्यक्ष एच नागेश, रामांना लमाणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, इंधन विभागाचे एसीएसजी कुमार नायक, समाज कल्याण विभाग आयुक्त डॉ. के. राकेशकुमार, निवृत्त आयएएस अधिकार के शिवराम आदींसह अनेक मान्यवर आणि अधिकार उपस्थित होते.

Tags: