Belagavi

जाधवनगर स्विमिंग पुलमध्ये पोहण्यास गेलेल्या युवकाचा मृत्यू

Share

पोहण्यासाठी उंचावरून पाण्यात उडी घेतल्यावर पाण्याचा अंदाज आल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगावात सोमवारी घडली. १७ वर्षीय गुरुदेव सिंगचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला

व्हॉइस : बेळगावातील लष्कराच्या कमांडो क्वार्टर्स येथील रहिवासी गुरुदेव सिंग आपल्या मित्राबरोबर पोहण्यासाठी हनुमान नगर येथील स्विमिंग पूल मध्ये गेला होता. यावेळी उंचावरून पाण्यामध्ये उडी मारण्याच्या नादात अंदाज न आल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुदेव सिंगचे वडील गुरुप्रीत सिंग बेळगावच्या कमांडो क्वार्टर्समध्ये सेवा बजावतात. मुलाच्या मृत्यूने सिंग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Tags: