Belagavi

अलतगा येथे शिवजयंती साजरी

Share

छत्रपती शिवाजी महाराज चौक आलतगा येथे देवस्थान पंच कमिटी च्या माध्यमातून जल्लोषात साजरी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत धुडूम होते.

प्रारंबी ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे यांच्या वतीने स्वागत व प्रास्ताविक करण्यात आले. प्रथमता गणपती मूर्ती चे पूजन लक्ष्मण उर्फ अप्पा पावशे यांच्या हस्ते करण्यात आले. अश्वरुडेश्वर शिवप्रतिमा पूजन देवस्थान पंच कमिटी चे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम यांच्या हस्ते करण्यात आले तर फलक पूजन देवस्थान पंच कमिटी सदस्य परशराम चिक्कलकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ देवस्थान पंच कमिटी सदस्य नारायण पावशे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी श्री धुडूम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार विचार फख्त महाराष्ट्र कर्नाटक व भारत देशा पुरता तेवढेच सीमित न ठेवता संपूर्ण जगामध्ये पेलण्याची गरज आहे, तसेच अठरा फगड जातीच्या लोकांना व्यवस्तीत रित्या आपल्या स्वराज्यमदें घेऊन जाण्याचे काम महाराजांनी केलेत असे मत व्यक्त करण्यात आले. या वेळी विक्रम चौगुले, महादेव घुग्रेटकर, बाळू पोटे, रघु पाटील, जनार्धन होनगेकर, पार्थ चिक्कलकर, केतन राजाई, शुभम पाटील, आनंद पाटील, मारुती होनगेकर, व महिला भगिनी, चिमुकले उपस्तित होते. आभार पुंडलिक पाटील यांनी मांडले.

Tags: