शिव–बसव जयंतीनिमित्त खानापुरातील संत ज्ञानेश्वर मंदिरात विशेष पूजा कार्यक्रम पार पडला.

होय, खानापूर शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिरात सोमवारी शिव-बसव जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याहस्ते बालशिवाजीचा नामकरण अर्थात पाळणा उत्सव पार पडला.
यावेळी त्यांनी स्थानिक महिलांच्या समवेत पाळणागीते गायिली. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. त्याची आरती करण्यात आली.
यावेळी स्थानिक नेते विवेक गिरी, दिलीप पवार, दयानंद चोपडे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Recent Comments