हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज बेळगाव परिसरात अभिमानाने साजरी करण्यात येत आहे. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनीही यानिमित्त शिवरायांना अभिवादन केले.

होय, सोमवारी सकाळी आ. अभय पाटील यांनी शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विशेष पूजा, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, बेळगावात परंपरेनुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. गेली 2 वर्षे कोविडमुळे जयंती साजरी करण्यावर निर्बंध आले होते. पण आता कोविडचा कहर कमी झाल्याने भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येत असून, युवकांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला आहे. चित्ररथांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
कर्नाटकात म्हैसूरचा दसरा प्रसिद्ध आहे. त्यानंतर 2 हजारहून अधिक कलाकारांचा सहभाग सोनार दुसरा कुठला उत्सव असेल तर तो बेळगावची शिवजयंती मिरवणूक होय. म्हैसूरचा दसरा पाहण्यासाठी देश-परदेशातून लोक येतात. योग्य प्रसिद्धी मिळाल्यास बेळगावची शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठीही देश-परदेशातून लोक मोठया संख्येने येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बेळगाव महानगर भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते, आ. अभय पाटील यांचे समर्थक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments