बसवराज बोम्मई हे संघ परिवाराचे नाहीत. त्यामुळेच रा. स्व. संघ त्यांना हटविण्याच्या मागे लागला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी केला आहे.

म्हैसूर येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना सिद्दरामय्या म्हणाले, बसवराज बोम्मई सरकारच्या विरोधात तक्रार येऊन बरेच दिवस झाले. त्यांच्या कारभारावरून तक्रार येऊनही बरेच दिवस झाले. विधानसभा निवडणूक कधी येते याची लोक प्रतीक्षा करत आहेत. भाजप सरकारला पायउतार करण्यासाठी लोक प्रतीक्षा करत आहेत असा दावा सिद्दरामय्या यांनी केला.
पुढील निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना पुढे आणू असे बी. एल. संतोष म्हणतात, कारण बसवराज बोम्मई आरएसएसचे नाहीत, म्हणूनच बोम्मई यांना बदलू असे ते म्हणताहेत. बोम्मई मूळचे जनता परिवाराचे आहेत. आमच्या सोबत होते. पण आमचे डाव ते शिकले नाहीत असे सिद्दरामय्या म्हणाले.
५४५ उमेदवारांची पीएसआय परीक्षा या सरकारने रद्द केली. यात प्रामाणिकपणे परीक्षा देणारेही आहेत. त्यांचे पुढे काय? असा सवाल करून सिद्दरामय्या म्हणाले, यात चूक कोणाचीही असो, कोणीही जबाबदार असो, सरकारनेच याची जबाबदारी घेतली पाहिजे. सरकारच भ्रष्ट असल्याने असे प्रकार घडत आहेत. २ वर्षे वाट पाहून जेवण-झोप विसरून अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा दिलेल्यांचे काय? असा सवाल त्यांनी केला.
एकंदर, पीएसआय परीक्षा रद्द केल्यावरून सिद्दरामय्यांनी राज्य सरकारवर असा हल्लाबोल केला आहे.


Recent Comments