Vijayapura

विजापूरच्या जवळी संघटनेचे स्तुत्य कार्य; मुस्लिमांसोबतच गरीब हिंदूंनाही फूडकीट्स

Share

कोविडची लाट असो किंवा अतिवृष्टी, कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यात त्या संघटनेचा मदतीसाठी पुढाकार असतोच. अशी कोणती ही संघटना म्हणताय? चला पाहुयात हा रिपोर्ट

होय, विजापूर जिल्ह्यातील जवळी संघटना नेहमी समाजकार्यात अग्रेसर असते. संकटकाळात समाजसेवा करणे हे या संघटनेचे ब्रीद बनले आहे. कोविड महामारीच्या काळातही अनेकदा गोरगरिबांच्या मदतीसाठी ही संघटना धावून गेली आहे. या संघटनेचे अध्यक्ष यासिन जवळी यांच्या नेतृत्वाखाली हे समाजकार्य चालते. आता रमजाननिमित्त केवळ मुस्लिम समाजातील गरिबांनाच नव्हे तर हिंदू समुदायाच्या गरिबांनाही अन्नदान करून या संघटनेने नवा आदर्श निर्माण केला आहे. पीठ, तांदूळ, शेवया, डाळ, गूळ, तेल अशी विविध अन्नसामग्री असलेली तब्बल १ हजार किट्स आज या संघटनेतर्फे गरिबांना वाटण्यात आली.

दरवर्षी शेकडो गरीब वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या यासिन जवळी यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेने १ हजार फूड किट्स वाटून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. जाती-पातीचा भेदभाव  न बाळगता दुःखी, कष्टी लोकांना आम्ही फूड किट्स वाटली आहेत अशी माहिती यासिन जवळी यांनी दिली.

एकंदर, जातपात, धर्माचा भेद न करता यासिन जवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चालविलेले हे समाजकार्य खरोखरच प्रशंसनीय आहे हे निश्चित.

Tags: