गरम नगरी विजापूरमध्ये ऐन उन्हाळ्यात चक्क धुके पसरल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला.
होय, मलनाड भागाप्रमाणे वातावरण निर्माण झाल्याचं आज विजापुरात पहायला मिळाले. रविवारी सकाळी विजापूर नगरी धुक्याची शाल लपेटल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी ऐन उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घेतला. राष्ट्रीय महामार्गावर धुक्यामुळे चालक हेडलाईट्स लावूनच वाहने चालवत होते. जगप्रसिद्ध गोलघुमटही धुक्याआड लपला. शहरात सर्वत्र थंड वातावरण पसरले होते. त्यामुळे उन्हाच्या झळांनी त्रासलेल्या विजापूरकरांना दिलासा मिळाला.


Recent Comments