मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत आज बंगळुरू येथे सेमीकंडक्टर प्लांट उभारणीसंदर्भात कर्नाटक सरकार आणि आयएसएमसी एनालॉग फॅब प्रमोशन लिमिटेड यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

राज्य सरकारच्या वतीने उद्योग खात्याचे एसीएस रमण रेड्डी आणि आयएसएमसी अनालॉग फॅब प्रमोशन लिमिटेडच्या वतीने संचालक अजय जालन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत कराराची देवाणघेवाण झाली. राज्यात या सेमीकंडक्टर कंपनीच्या स्थापनेतून 7 वर्षांत 22900 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या कंपनीमुळे 1500 जणांना रोजगार मिळणार आहे. अशा महत्वाच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी उच्च शिक्षण आणि आयटी आणि बीटी मंत्री डॉ सीएन अश्वत्थ नारायण, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, आयटी बीटी संचालिका मीना नागराज, भारतातील इस्रायलचे राजदूत नवर गिलॉन आणि इराज इंबरमन यांच्यासह इतर उपस्थित होते.


Recent Comments