Belagavi

घटप्रभा येथे जारकीहोळी फौंडेशनच्या शिबिराचा समारोप

Share

येथे मिळालेले प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचा सदुपयोग करा, तुमच्यासारख्याच गोरगरीब, दीनदलित विध्यार्थ्यांना येथे प्रशिक्षणासाठी पाठवा असे आवाहन मानव बंधुत्व वेदिकेचे संचालक रवींद्र नायकर यांनी केले.

घटप्रभा येथील डॉ. एन. एस. हर्डीकर सेवादलाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राने देवदासींची मुले, दीनदलित आणि मागास मुलांसाठी सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या दहा दिवसांच्या पोलीस कॉन्स्टेबल आणि सैनिक प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ पार पडला. यावेळी प्रशिक्षणार्थीना उद्देशून बोलताना मानव बंधुत्व वेदिकेचे संचालक रवींद्र नायकर म्हणाले, तुम्ही येथे खडतर प्रशिक्षण घेतले आहे, ही समाधानाची बाब आहे. पण आता तुमच्याहून अधिक त्रासात असलेल्या युवकांना या प्रशिक्षणासाठी पाठवा. विजापूर, रायचूर, बळ्ळारी, विजयनगर अशा दूरच्या ठिकाणी असलेली परिस्थिती आम्हाला माहित नसते. त्यामुळे स्थानिक भागातच तुम्ही असे प्रशिक्षण घेतलेले चांगले. त्याशिवाय यापुढेही रोजगाराबाबत काही माहिती हवी असेल तर आमच्याशी थेट संपर्क साधा असे त्यांनी सांगितले.

नायकर पुढे म्हणाले, सतीश जारकीहोळी फौंडेशनतर्फे उद्योजकता प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. त्यात आयएएस, केएएस, हॉटेल मॅनेजमेंट, हवाईसुंदरी आदी अनेक प्रकारच्या रोजगारांची माहिती, आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याशिवाय लवकरच विध्यार्थ्यांसाठी भव्य प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. येत्या जूनच्या आत हे केंद्र कार्यान्वित होईल अशी माहितीही नायकर यांनी दिली. यावेळी बोलताना निवृत्त प्राचार्य डॉ. एच. आर. स्वामी म्हणाले, शिकण्याच्या वयात आपण शिकलेले आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांना समजावून सांगितले तर त्या विषयाचे आपले ज्ञानही अधिक आकलन होते. त्यामुळे अभ्यासासोबतच घडामोडींची माहिती देणारे अवांतर वाचनही विध्यार्थ्यानी केले पाहिजे. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना नियमित अभ्यासासोबतच अवांतर वाचनाचे फायदे होतात.

प्रा. संतोष मेळवंकी यावेळी म्हणाले, सतीश जारकीहोळी फौंडेशनतर्फे १० दिवसात मोफत दिलेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन तुमचे करिअर यशस्वी करा. व्यावसायिक कोचिंग सेंटरमध्ये पैसे दिल्यावरही इतके दर्जेदार प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे याचा सदुपयोग करून जीवन यशस्वी करा असा सल्ला दिला. यावेळी प्रा. हनुमंत नंदी म्हणाले, विध्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचे सतीश जारकीहोळी फौंडेशनचे कार्य स्तुत्य आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. समारोप समारंभात प्रशिक्षणार्थींनी मनोदय व्यक्त करून सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. घरची उणीव भासु न देता काळजी घेतलेले प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

या शिबिरात प्रशिक्षणार्थींना लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, १६०० व ५००० मीटर धावणे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल आणि सैनिक प्रारूप परीक्षेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

Tags: