बेळगावचा स्केटींगपटू मनीष संजीव प्रभू हा २०२२चा जिल्हास्तरीय बालप्रतिभा पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

होय, महिला व बालविकास खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत 28 एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात बेळगाव येथील रोलर स्केटिंग अकादमीच्या मनीष संजीव प्रभू याला कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय देवराज अर्स यांच्या हस्ते २०२२चा जिल्हास्तरीय बाल प्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१० हजार रुपये रोख, शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी बीम्सच्या सीईओ सईदा आफ्रिना बानू, भारती वाळवेकर, समाज कल्याण खात्याच्या सहसंचालिका उमा सालीगौडर, आनंद लोबो आणि कविता अक्की यांच्यासह स्केटिंगपटू मनीषचे पालक आणि प्रशिक्षक उपस्थित होते.


Recent Comments