बेळगावमधील के एल इ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केली आहे. अमेरिकन विद्यापीठातून मानद डॉक्टरेट मिळविणारे डॉ. कोरे हे पहिले भारतीय आहेत.

अमेरिकेतील फिलाडेल्सी येथील प्रतिष्ठित थॉमस जेफरसन विद्यापीठाने डॉ. प्रभाकर कोरे यांच्या शिक्षण, आरोग्य सेवा, वैद्यकीय संशोधनातील आंतरराष्ट्रीय सहयोगाबद्दल मानद डॉक्टरेट देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतील फिलाडेल्सी थॉमस जेफरसन विद्यापीठाच्या घटकोत्सवात २५ मे रोजी पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी बेळगाव केएलई विद्यापीठात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत केएलई संशोधन केंद्राचे संचालक डॉ. शिवप्रसाद गौडर बोलताना म्हणाले, प्रभाकर कोरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट बहाल करण्यात येणार आहे. २५ मे रोजी थॉमस जेफरसन विद्यापीठात हि पदवी बहाल करण्यात येणार असून याचवेळी थॉमस जेफरसन विद्यापीठाच्या इंडिया सेंटरचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
यानंतर थॉमस जेफरसन विद्यापीठाचे ग्लोबल अफेअर्सचे प्रमुख डॉ. रिचर्ड डर्मन बोलताना म्हणाले, प्रभाकर कोरे यांना हि पदवी केवळ ते कुलगुरू आहेत म्हणून देण्यात येत नसून त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल देण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी उपकुलगुरू डॉ. विवेक सावजी, डॉ. कोटीवाले उपस्थित होते.


Recent Comments