Kagawad

मदभावी शनैश्‍वर मंदिरात सामूहिक नवग्रह होम

Share

कागवाड तालुक्यातील मदभावी गावातील श्री शनैश्वर स्वामी मंदिरात शनि अमावास्येनिमित्त सामूहिक नवग्रह होमाचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवारी पहाटेपासूनच मंदिराचे शास्त्री प्रवीणशास्त्री हिरेमठ यांनी मंदिराचे धर्माधिकारी डॉ. मारुती भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नवग्रह विधान कार्यक्रम पार पाडला. मारुती भंडारे यांच्या हस्ते शनी पूजनाचा कार्यक्रम झाला.

या दरम्यान बोलताना, प्रवीणशास्त्री हिरेमठ यांनी सांगितले की, लोक कल्याणासाठी, दोष परिहार आणि संकटे येऊ नयेत यासाठी शनेश्चर मंदिरात शनिवार अमावास्येनिमित्त अग्नि नवग्रह होम, विशेष शनी पूजा करण्यात आली. हे विधी वैयक्तिकरित्या करणे कठीण जाते. त्यामुळे ते सामूहिकरीत्या करण्यात आले. प्रत्येकाला त्याचे फळ मिळावे या शुद्ध भावनेने हे पूजन करण्यात आल्याचे सांगितले.

या प्रसंगी मदभावीसह शेजारील अथणी, कागवाड, मिरज, सांगली आदी ठिकाणच्या भक्तांनी शनिपूजनात भाग घेतला.

 

Tags: