हिंदी हि राष्ट्रभाषा व्हावी, अशी प्रतिक्रिया देत राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी हिंदी भाषेच्या बाजूने समर्थन केले आहे.

हिंदी ला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा, ऑफिशियल लँग्वेज म्हणून हिंदी भाषेचा वापर व्हावा, आणि हिंदी हि राष्ट्रभाषा म्हणून जाहीर व्हावी, असे मत राज्यसभा सदस्य आणि हिंदी राष्ट्र भाषा सल्ला समितीचे सदस्य इरण्णा कडाडी यांनी व्यक्त केले.
विजापूर जिल्ह्यातील इंडी परिसरात प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली असून प्रत्येकाला आपल्या भाषेसह प्रत्येक भाषेचा गौरव असावा, असे मत व्यक्त केले. प्रत्येक राज्याची एक प्रादेशिक भाषा असते. याचप्रमाणे देशभरात विविध भाषा बोलल्या जातात. आपल्याला बंगाली येत नाही आणि इंग्रजी हि इंग्रजांनी भारतात सोडून गेलेली भाषा आहे. इतर देशांप्रमाणे भारतालाही राष्ट्रभाषा असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रत्येक राज्यातील प्रादेशिक भाषेचा आपण सन्मान केला पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर एक विशिष्ट भाषा असावी यासाठी आपण हिंदी भाषेला महत्व देत असल्याचे कडाडी म्हणाले.
हिंदी हि राष्ट्रभाषा व्हावी असा विचार इरण्णा कडाडी यांनी व्यक्त केला असून प्रत्येकाने प्रत्येक भाषेचा आदर करावा, असा अभिप्राय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.


Recent Comments