Nippani

चिकोडी तालुक्यातील खडकलाट ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार बिल मिळविण्यासाठी बेकायदेशीरपणे लावण्यात आली झाडे ग्राम पंचायत अधिकारी, सदस्यांचा भ्रष्टाचार उघड

Share

शेतकऱ्याच्या जमिनीत बेकायदेशीरपणे झाडे लावून केवळ बिले मिळविण्यासाठी केलेला खडकलाट ग्रामपंचायत अधिकारी आणि सदस्यांच्या भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील खडकलाट ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या नंदकुमार मगदूम या शेतकऱ्याच्या शेतजमिनीत बेकायदेशीर पणे झाडे लावण्यात आली आहेत. नंदकुमार मगदूम हे भारतीय सैन्यदलात सेवा बजावतात. खडकलाट ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या गायरान जमिनीलगतच नंदकुमार मगदूम यांची शेतजमीन आहे.गेल्या काही वर्षांपासून नंदकुमार हे चांदशिरवाड या गावात मुक्कामाला आहेत. यांच्या शेतजमिनीत बेकायदेशीर रित्या पंचायत अध्यक्ष, पीडीओ, सदस्य आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने केवळ बिले काढण्यासाठी या शेतजमिनीत झाडे लावण्यात आली आहेत. सदर प्रकार मगदूम यांच्या निदर्शनास आला असून त्यांनी याविरोधात कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे.

नरेगा योजने अंतर्गत हा भ्रष्टाचार करण्यात आला असून हि बाब बेकायदेशीर असल्याचे उघडकीस आले आहे. दुसऱ्याच्या जमिनीवर डोळा ठेवून पंचायतीने केलेल्या या कामासंदर्भात अनेकवेळा बजावण्यात देखील आले आहे. शेतकऱ्यांना कायद्याचा धाक दाखवून ७ ते ८ वर्षे आंदोलन करावे लागेल असे सांगून शेतकऱ्यांना गप्प बसविण्यात येत आहे. खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष आणि यामागील कालावधीत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना घाबरविण्याचे काम केले आहे. हि जमीन गिळंकृत करण्याचे षडयंत्र रचण्यात येत असून अशा अनेक लोकांची फसवणूक करण्यात आली असून सदर बाब शेतकरी संघ चिकोडी तालुका विभागाचे अध्यक्ष मंजुनाथ परगौड यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. प्रकरण उघडकीस येताच घटनास्थळी मंजुनाथ परगौड दाखल झाले. सदर शेतजमीन तपासून पंचायतीच्या अनागोंदी कारभाराबद्दल त्यांनी जाब विचारला. सदर प्रकरणी आपली चूक झाल्याचे पंचायत पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मान्य केले. तसेच नंदकुमार मगदूम यांना ६ महिन्याची भरपाई आणि शेतजमिनीची मशागत करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
शेतकऱ्याच्या शेतजमिनीत घडलेल्या प्रकाराबाबत शेतकरी नंदकुमार मगदूम यांनी आवाज उठविला असून सदर शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे. यासंदर्भातील नुकसान भरपाईबद्दल पंचायतीच्या वतीने पत्र देखील लिहून देण्यात आले असून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यात मंजुनाथ परगौड यांचा मोलाचा वाटा आहे.

याप्रकरणी कर्वे नेते संजू बडिगेर, बाळगौड पाटील, शंकर हेगडे, अप्पू पाटील, सत्याप्पा देवानगोळ, केदारी मांगनूर, सदू पाटील, संघटनेचे सदस्य यांनीही लक्ष घालून नंदकुमार यांच्या लढ्याला साथ दिली आहे.

Tags: