चिक्कोडी उपविभागात अनेक गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. चिक्कोडी, रायबाग तालुक्यात झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांत समाधान पसरले असले तरी, जनसामान्यांची तारांबळ उडाली.

होय, चिक्कोडी उपविभागातील अनेक गावांत अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. सदलगा येथे वीज कोसळल्याने नारळाचे एक झाड जळून खाक झाले आहे.
उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची मात्र या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे. नांगरणीसाठी जमीन भुसभुशीत करण्यास हा पाऊस उपयोगी पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरणी आणि पेरणीची तयारी सुरु केली आहे.


Recent Comments