Chikkodi

करोशीत इफ्तार मेळाव्यात ५ हजार जणांना भोजन

Share

 पवित्र रमजान महिन्याचा भाग म्हणून चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात इफ्तार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारहून अधिक लोकांना भोजन देण्यात आले.

होय, पवित्र रमजान महिन्याचा भाग म्हणून करोशी गावात रायबाग ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष इरगौडा पाटील आणि काँग्रेस नेते एम. एच. पटेल यांनी इफ्तार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात ५ हजारहून अधिक लोकांना भोजन देण्यात आले.  इफ्तार मेळाव्यात बोलताना ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष इरगौडा पाटील म्हणाले, रमजान महिन्यात अन्नदान केल्याने पुण्य लाभते. हिंदू-मुस्लीम एकात्मता वाढीसाठी या इफ्तार मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर बोलताना काँग्रेस नेते एम. एच. पटेल म्हणाले, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इफ्तार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सुमारे ५ ते ६ हजार लोकांना जेवण देण्यात आले आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे हा मेळावा प्रतीक ठरला आहे.

 याप्रसंगी दुंडाप्पा घरगुडे, जी. एल. बंडगार, नानागौडा पाटील, अर्जुन कमते, राजू इराप्पा कोटगी, रमेश बेळगली, युसूफ पटेल, गंगाधर देवऋषी आदी उपस्थित होते.

 

Tags: