बेंगळुरू मध्ये आयोजिण्यात आलेल्या ४० व्या राज्यस्तरीय ज्योडी स्पर्धेत बेळगावमधील डीवायएस संघाला १९ पदके प्राप्त झाली आहेत.

२१ एप्रिल ते २३ एप्रिल या दरम्यान बेंगळुरू मधील जे पी नगर येथील ४० व्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धीत ज्युनियर गटात
४० किलो वजन विभागात सूरज सावंत, ३६ किलो वजन विभागात अमृता नाईक, ४४ किलो वजन विभागात सोनालिका सीएस, ४८ किलो वजन विभागात शगुफ्ता नाजगे, ५७ किलो वजन विभागात आफिन बानू, ५५ किलो वजन विभागात कार्तिक पाऊसकर यांनी सुवर्ण पदक तर ६० किलो वजन विभागात अब्दुल रेहमान, ५० किलो वजन विभागात साई पाटील, ५२ किलो वजन विभागात जी गे बेळ्ळी यांनी रौप्य पदक पटकाविले.
कॅडेट विभागात ६० किलो वजन विभागात अरुण माळी, ७३ किलो वजन विभागात हरीश सतवाडी, ४४ किलो वजन विभागात ऐश्वर्या, ५२ किलो वजन विभागात रक्षिता कोमार, ७० किलो वजन विभागात भूमिका व्ही एन यांनीं सुवर्ण पदक तर ५० किलो वजन विभागात प्रवीण बडिगेर, ८१ किलो वजन विभागात रोहन बीएस यांनी रौप्य तर ५५ किलो वजन विभागात प्रकाश आणि ९० किलो वजन विभागात दीक्षांत आदींनी कांस्य पदक पटकाविले. या साऱ्या ज्युडो पटुंना रोहिणी पाटील, संजीव नाईक, बसवराज मिल्लानट्टी, कुतूजा मुलतानी आदींचे मार्गदर्शन लाभले.


Recent Comments