हुक्केरीतील नगरसेवक पत्रकार राजू कुरंदवाडे यांनी आपल्या जन्मदिनानिमित्त नेत्रदानाचा संकल्प केला आहे.

होय, आपल्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक पत्रकार राजू कुरंदवाडे यांनी आपले दोन्ही डोळे मरणोत्तर दान करण्याचा संकल्प केला आहे. हुक्केरीत झालेल्या मोफत आरोग्य मेळाव्यात त्यांनी आपल्या निधनानंतर कुटुंबियांच्या संमतीने आपले दोन्ही डोळे नेत्रपेढीला दान करण्यासाठी नावनोंदणी करून घोषणापत्र दाखल केले.
हुक्केरी तालुका आरोग्याधिकारी उदय कुडची आणि मुख्य वैद्याधिकारी महांतेश नरसन्नवर यांनी त्यांच्या या कार्याचा गौरव करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.


Recent Comments