सर्वश्रेष्ठ गुण जर कुणा एकाच व्यक्तीमध्ये असतील तर ते गुण पूज्य सिद्धेश्वर श्री यांच्यामध्ये आढळून येतात, असे प्रतिपादन सुत्तर श्रीक्षेत्राचे पूज्य श्री डॉ. शिवरात्री देसीकेंद्र महास्वामींनी केले.

: विजापुरातील डॉ. महांतेश बिरादार यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री डॉ. शिवरात्री देसीकेंद्र महास्वामींनि प्रवचन दिले. अध्यात्मिक जगतातील पूज्य सिद्धेश्वर हे केवळ त्यांच्या ज्ञानासाठीच प्रसिद्ध नाहीत तर अनेकांच्या जीवनाचा ते आदर्श असल्याचे ते म्हणाले.सर्वश्रेष्ठ गुण जर कुणा एकाच व्यक्तीमध्ये असतील तर ते गुण पूज्य सिद्धेश्वर श्री यांच्यामध्ये आढळून येतात, असे प्रतिपादन डॉ. शिवरात्री देसीकेंद्र महास्वामींनी केले.
गोलघुमट आणि वचनघुमट यामुळे विजापूरची ख्याती मोठी आहे. हळकट्टी यांचे वाचनसाहित्य आज जगभरात उपलब्ध आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे विजापूरचे नाव चिरतरुण राहील, असा विश्वास स्वामींनी व्यक्त केला.
निवडणूक पद्धतीत बदल होणे गरजेचे असल्याचे सांगत निवडणुकीत केवळ द्विपक्षीय धोरण राबवावे. ५० टक्क्यांहून अधिक मते घेतलेल्या उमेदवारांना विजेतेपद देण्यात यावे, यासाठी लोणी बी के गावातून पदयात्रा काढण्यात आली आहे. बापुराय लोणी यांच्या माध्यमातून हि पदयात्रा काढण्यात आली असून कोविड काळात त्यांनी अत्यंत माफक दरात रोगाचे निदान आणि उपचार केले आहे. युक्रेन मधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, हि महत्वाची गोष्ट विजापूरमध्ये घडल्याबद्दल त्यांनी प्रशंसा व्यक्त केली.
दानशूर डॉ. कंठीरव कुल्लोळ्ळी, हळकट्टी संशोधन केंद्रात २० वर्षांपासून निस्वार्थ सेवा पुरविणारे डॉ एम एस मद्भवी, सिद्धसिरी सौहार्द बँकेचे संचालक साईबाबा सिंदगेरी, बसवणं बागेवाडी येथील मुख्य पशु वैद्याधिकारी डॉ. प्रल्हाद पाटील यांचा पूज्य श्रींनी सन्मान केला. यावेळी विविध माठातील स्वामीही सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्षा सुजाता सोमनाथ कळ्ळीमनी, संगमेष बबलेश्वर, डॉ. गंगाधर संबन्नी, डॉ. महांतेश जालगेरी, जगदीश कोट्रशेट्टी, गुरूशांत कापसे, चंद्रकांत डोणगि, शंकर सिडारेड्डी आदी उपस्थित होते.


Recent Comments