अखिल भारत वीरशैव महासभा जिल्हा घटक बेळगाव आणि जगज्योती श्री बसवेश्वर जयंती उत्सव मध्यवर्ती समितीच्या वतीने ३० एप्रिल रोजी बसवेश्वर चौकात बसव जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. बसवजयंती कार्यक्रमाचे उद्घाटन ध्वजारोहणाने करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्सव समितीच्या अध्यक्षा ज्योती भाविकट्टी यांनी दिली.

गुरुवारी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. ३० एप्रिल रोजी जयंती उत्सवाचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते होणार आहे. यासह खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पार पाडणार आहे.
जयंती उत्सवाच्या निमित्ताने लिंगायत भवन येथे सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे रोजी वचन गायन स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता चन्नम्मा चौक ते शहापूर येथील बसवेश्वर सर्कल पर्यंत बाईक रॅली, २ मे रोजी सायंकाळी ४ वाजता शिवबसव नगर येथील लिंगायत भवन येथे महिलांसाठी कार्यक्रम, ३ मे रोजी बसव जयंती निमित्त बसवेश्वर मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ज्योती भाविकट्टी यांनी दिली. ()
यावेळी रत्नप्रभा बेल्लद, रमेश कळसन्नवर, सुजित मुळगुंद आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments