Belagavi

नवी गल्ली शहापूर येथे एकोप्यात इफ्तार पार्टीचे आयोजन

Share

बेळगाव  शहापूर नवी गल्ली येथे सर्वधर्म समभावाचे संदेश देत रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

शहापूर नवी गल्ली येथील मशिदी समोर या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी, अमजद मोमीन, हमीद बागलकोटी, अब्दुल बागलकोटी, नगर सेवक रवी साळुंखे, बसवेश्वर बँकेचे संचालक सतीश पाटील, माजी उपमहापौर नेताजीराव जाधव, परशराम ढगे, भवानीसिंग राजपुरोहित, नवी गालिचे पंच अश्फाक घोरी,  शहापूर पोलीस स्थानकाचे अधिकारी व  इतर या वेळी उपस्थित होते .

Tags: