Belagavi

सेवानिवृत्ती निधी न दिल्यास आत्महत्येचा इशारा

Share

 केएसआरटीसीने सेवानिवृत्ती निधी त्वरित दिल्यास चिक्कोडी विभागीय कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करू, असा इशारा निवृत्त बसचालक साताप्पा आगसर यांनी दिला आहे.

चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावातील साताप्पा आगसर हे गेल्या 30 वर्षांपासून केएसआरटीसीचे चालक म्हणून सेवा बजावून 2020 मध्ये निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतरचा निधी म्हणून त्यांना केएसआरटीसीने 15 लाख रुपये दिले असून आणखी 17 लाख रुपये द्यायचे आहेत. मात्र आता हे पैसे देण्यास  टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप साताप्पा यांनी केला आहे. गेल्या 2 वर्षांपासून साताप्पा चिक्कोडीच्या विभागीय कार्यालयात चकरा मारून ते थकले आहेत. केएसआरटीसीच्या विभागीय नियंत्रकांना दर आठवड्याला या संदर्भात ते भेटतात. परंतु त्यांना काही ना काही आश्वासन देऊन माघारी पाठविले जाते. मी सध्या घर बांधत आहे, मुलांचे विवाह अशा अनेक समस्या आहेत. येत्या पाच  दिवसांत माझा सेवानिवृत्ती निधी न दिल्यास केएसआरटीसीच्या विभागीय कार्यालयासमोर विष घेवून आत्महत्या करेन, असा इशारा साताप्पा आगसर यांनी दिला आहे.

याबाबत ‘आपली मराठी’ला माहिती देताना केएसआरटीसी, चिकोडीचे विभागीय नियंत्रक शशिधर म्हणाले, कोरोनामुळे परिवहन विभाग तोट्यात आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निधी देण्यास थोडा उशीर होत आहे. साताप्पा आगसरा हे वैयक्तिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यांचा निवृत्ती निधी लवकरात लवकर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

एकंदर, सेवानिवृत्ती निधी लवकर न दिल्यास आत्महत्येचा इशारा सतापा यांनी दिला आहे. किमान आता तरी केएसआरटीसी अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचा निवृत्ती निधी लवकर द्यावा हीच सर्वांची अपेक्षा आहे.

 

Tags: