ग्रामीण भागातील गुरांवर योग्य वेळी उपचार झाले पाहिजेत असे अन्न व नागरी पुरवठा आणि वन खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले.

हुक्करी तालुक्यातील गुडस गावात नवीन पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण मंत्री उमेश कत्ती यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यानंतर बोलताना मंत्री कत्ती म्हणाले, सरकार शेतकरी आणि त्यांच्या पाळीव जनावरांच्या रक्षणासाठी राबवित असलेल्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. राज्य आरआयडीएफ प्रकल्पांतर्गत 43 लाख रुपये निधीतून पशु चिकित्सालयाची सुसज्ज इमारत बांधणारे कंत्राटदार बसवराज वड्डर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. फ्लो
ग्रामपंचायत अध्यक्ष अप्पाण्णा खातेदार, पशुवैद्यकीय विभागाचे सहायक संचालक देसाई, वैद्यकीय अधिकारी नाईक यांच्यासह गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.


Recent Comments