Belagavi

माणसाचा जन्म मिळणे पुण्याचे; सर्वानी एकोप्याने रहावे : चन्नराज हट्टीहोळी

Share

८२ लाख योनीतून माणसाचा जन्म मिळणे पुण्याचे काम आहे. त्यामुळे सर्वानी एकोप्याने राहण्याचे आवाहन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले.

बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील मदरशात रविवारी सायंकाळी आयोजित इफ्तार  मेळाव्यात ते बोलत होते. जात कोणतीही असो, आपण सर्व मानव आहोत. परस्पर प्रेम आणि विश्वासाने जगा. सगळ्या प्राण्यात माणूसप्राणी वरच्या स्तरावर आहे. त्यामुळे माणसाने या जन्माचा सदुपयोग केला पाहिजे. जातीमध्ये तेढ निर्माण करणे योग्य नाही, शांतता आणि सहअस्तित्व आज महत्त्वाचे आहे असे हट्टीहोळी  म्हणाले.

त्याचवेळी मुतनाळचे शिवानंद शिवाचार्य स्वामी म्हणाले, आपण सर्व एकच पाणी पितो, एकाच जमिनीवर  राहतो, एकाच हवेत श्वास घेतो. त्याला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावे असतील. हे लक्षात घेऊन सगळ्यांनी एकोप्याने रहावे हाच सर्व धर्मांचा संदेश आहे असे त्यांनी सांगितले. बाईट

यावेळी नांदेड श्री नीलकंठ लिंग शिवाचार्यस्वामी यांनीही जातीय सौहार्दाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला विधानसभा सदस्य लखन जारकीहोळी, गंगण्णा कल्लूर, बसवराज रायगोळ, अब्दुल बागवान, तौसिफ फणीबंद, युनूस बागवान, नूर अहमद मुल्ला, मीरासाब मुल्ला, मौलाना जैनुल आबिदीन, आसिफ मुल्ला आदी उपस्थित होते.

 

Tags: