Belagavi

डॉ. राजकुमार यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ संगीत कार्यक्रम क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठानचा उपक्रम संगीत कार्यक्रमाचे आयोजन

Share

बेळगावमधील क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. राजकुमार यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वडगाव येथील संजीवनी फाउंडेशन येथे क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. राजकुमार यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. राजकुमार यांची नातं सरस्वती नटराज कोसगी, डॉ. सविता देगीनाळ, केएलई युनिव्हर्सिटीचे संगीत शिक्षक डॉ. सुनीता पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

या कार्यक्रमात सरस्वती नटराज कोसगी यांनी उपस्थितांना उद्देशून मनोगत व्यक्त केले. माझ्या आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याला आनंद झाला आहे. मलाही संगीताची खूप आवाड आहे. समाजसेवा करण्यासाठी प्रत्येकाची मानसिकता हवी, हे येथे येऊन आपण शिकले अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी क्रांती महिला मंडळाच्या सदस्या आणि उमा संगीत प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केक कापून डॉ. राजकुमार यांच्या जन्मदिनाचे आचरण केले. यावेळी शिल्पा पुंडे, श्रीमती अंजना कित्तूर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उमा संगीत प्रतिष्ठानच्या सदस्यांनी संगीत कार्यक्रम सादर केला.

या कार्यक्रमास स्वप्ना चौगुले, पद्मजा चौगुले, लीला शेरी, शोभा शेरी, निर्मला दरगशेट्टी, सुनीता पाटील, नयना गिरीगौडर, विना गडतन्नवर, राजेश्वरी गुरव, मंजुळा चुनमरी, सुलोचना वस्त्रद, मंदाकिनी नरलेकर, सुनीता गुळ्ळ, आशा निलजगी आदी महिला उपस्थित होत्या.

Tags: