बेळगाव शहरातील समर्थ नगर येथील श्री रेणुकादेवी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज पारायण सोहळ्याची सांगता पारायण दिंडी सोहळ्याने झाली.

: समर्थ नगर येथील श्री रेणुकादेवी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या श्री ग्रंथराज पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पारायण सोहळ्याची सांगता दिंडी सोहळा आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम आणि दिंडी सोहळ्यात वैष्णवांनी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात सहभाग घेतला.
या सांगता समारंभात आमदार अनिल बेनके यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी बोलताना आमदार बेनके म्हणाले, गेल्या २ वर्षांत वारकऱ्यांना कोविड कारणास्तव पंढरपूर येथे जाता आले नाही. मात्र यंदा कोविड परिस्थिती नियंत्रणात आल्याने भक्तिपूर्ण उत्साहात वारकरी वारीमध्ये सहभागी होऊ शकतात.
समर्थ नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पारायण सोहळ्यात अनेक वाचकांनी सहभाग घेतला होता. वारकरी संप्रदायातील विविध मान्यवरांची प्रवचने, कीर्तन तसेच विविध भजनी मंडळांचा जागराचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. या पारायण सोहळ्यात मल्लिकार्जुन नगर, महाद्वार रोड, शहापूर यासह विविध भागातील भाविक सहभागी झाले होते. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या समारोपाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या दोन वर्षात कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करता न आल्याने हिरमुसलेल्या वारकऱ्यांमध्ये यंदाची वारी करायला मिळणार याचा उत्साह दिसून येत होता.


Recent Comments