बेळगावमधील जीएसएस महाविद्यालयाच्या प्रांगणात कलेला वाव देण्यासाठी चित्रकला उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.

रोटरी इ क्लब, जीएसएस महाविद्यालय, गुलमोहोरबाग कला संघ तसेच तरुण भारत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसएस महाविद्यालयाच्या प्रांगणात चित्रकला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात शहरातील प्रख्यात चित्रकला कलाकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उद्देशून वैशाली मराठे आणि रोटेरियन अनंत नाडगौड यांनी भाषण केले. बेळगाव शहरात चित्रकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हे पहिलेच वर्ष असल्याने हा उपक्रम अल्प प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात अनेक कलाकार मोठ्या उत्साहात सहभागी झाले असून दरवर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. जागतिक कला दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे या मान्यवरांनी सांगितले.
यावेळी गुलमोहोर बाग कला संघाच्या कलाकार शिल्पा खडकबावी म्हणाल्या, बेळगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला उत्सवात लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. बेळगाव शहरात कलात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून कलाप्रेमींनी या कलाकृती पाहण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी चित्रकला उत्सवात सर्व कलाकारांनी उत्साहात सहभाग घेतला.


Recent Comments