बेळगाव शहरात रोलर्स स्केटिंग अकादमीच्या वतीने स्केटिंग चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील प्रतिष्ठित केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंग्जवर रविवारी स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे १६० स्केटर्सनी सहभाग घेतला होता. ५ वर्ष आणि त्याहून अधिक तसेच, १७ वर्ष वयोगटातील मुले या स्पर्धेत सहभागी झाली होती.
या स्पर्धेला समाजसेवक राकेश कलघटगी , रसिकांत खुले , तुकाराम पाटील, विनयकुमार बगली, श्रीकांत मेंडके , संगीत निलजकर, प्रमिला शिलेदार आदी मान्यवरांच्या हस्ते चालना देण्यात आली .या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रक्षिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर , योगेश कुलकर्णी, सक्षम जाधव, अजित शिलेदार, नितीन कुडाले, सागर चौगुले व इतर उपस्थित होते .


Recent Comments