बेळगावमधील प्रगतिशील लेखक संघातर्फे पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार दिनांक २४ एप्रिल रोजी करण्यात आले होते. मराठी विद्यानिकेतन येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात विविध मान्यवरांनी सहभाग घेत साहित्याचा मेळा भरविला.

साहित्य संमेलनाची सुरुवात मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, ऍड. राजाभाऊ पाटील, भालचंद्र कांगो, प्रा. आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, ऍड. नागेश सातेरी आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सत्रात श्रद्धांजली ठराव मांडण्यात आला. यानंतर मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांच्यावतीने प्रार्थना सादर करण्यात आली. प्रगतशील लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. तर राजाभाऊ शिरगुप्पे, राजाभाऊ पाटील आणि नागेश सातेरी यांच्याहस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोशनी हुंदरे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले तर ऍड. राजाभाऊ पाटील यांनी उद्घाटनपर भाषण केले. या संमेलनाच्या निमित्ताने ‘ब्राह्मणी मानसिकता आणि पु ल देशपांडे या संजय मेणसे लिखित आणि कॉ. कृष्णा मेणसे यांचे चरित्र हे सुभाष धुमे लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांचे अध्यक्षीय भाषण पार पडले.
यावेळी आपल्या भाषणात ऍड. राजाभाऊ पाटील बोलताना म्हणाले, कार्यकर्ते तयार कारण हि अधिक महत्वाचे आहे. कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय साहित्य चळवळी यशस्वी होऊ शकत नाहीत. या संबंध चळवळीमध्ये डावा आणि उजवा असे दोन भाग असून डाव्या विचारसरणीत समतेचा, सक्षमतेचा, आर्थिक समानतेचा विचार आहे. हे विचार घेऊन समानतेने पुढे जाणे आणि केवळ आर्थिक सुबत्तेवर संघर्ष करणे या गोष्टी समाजाच्या शोषणावर टिकून आहेत. या दोन विचारांच्या संघर्षात नेहमीच कष्टकऱ्यांच्या विजय होत आला आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. भालचंद्र कांगो यांचे देशातील सद्यस्थिती व लेखकांची जबाबदारी या विषयावर व्याख्यान झाले. या सत्राचे अध्यक्ष भाई अशोक देशपांडे हे होते. तर तिसऱ्या सत्रात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लेखकांचे योगदान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात डॉ. प्रा. द. तू. पाटील, कॉ. संपत देसाई, कॉ. अनिल आजगावकर आदी मान्यवर सहभागी झाले होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे हे होते. यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. चौथ्या सत्रात डॉ., प्रा. नवनाथ शिंदे, आजार यांचा संत तुकाराम हा एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
संमेलनाच्या संयोजन समितीमध्ये आनंद मेणसे, अनिल आजगावकर, मधू पाटील, कृष्णा शहापूरकर, प्रा. अशोक अलगोंडी, प्रा. निलेश शिंदे, ऍड. अजय सातेरी, भरत गावडे, शिवलेला मिसळ, संदीप मुतगेकर, प्रा. दत्त नाडगौडा, सुभाष कंग्राळकर, रोशनी हुंदरे, प्रा. मयूर नागेनहट्टी, कीर्तिकुमार दोसी, ऍड. नागेश सातेरी, कॉ. कृष्णा मेणसे यांच्या सहभाग होता.


Recent Comments