काश्मीरच्या खोऱ्यात सर्वाधिक घेतले जाणारे उत्पादन म्हणजेच सफरचंद. सफरचंदचे उत्पादन घेण्यासाठी विशिष्ट अशा तापमानाची आवश्यकता असते. मात्र याला अपवाद ठरतोय तो विजापुरातील शेतकरी… विजापूर भागात सफरचंदचे उत्पादन घेऊन सर्वोत्तम उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याच्या या सफरचंद प्रयोगाचा आढावा घेतलाय आमचे विजापूरचे प्रतिनिधी विजयकुमार सारवाड यांनी…! पाहुयात यासंदर्भातील हा विशेष रिपोर्ट!

व्हॉइस : काश्मीरच्या बर्फ़ाळ वातावरणात पिकविले जाणारे सफरचंद आता खुद्द कर्नाटकाच्या भूमीत पिकविले जात आहे. हा अनोखा कृषी प्रयोग पाहून प्रत्येकाला आश्चर्य नक्कीच वाटेल. मात्र विजापूर जिल्ह्यातील कोल्हार या गावातील प्रगतशील शेतकरी सिद्दप्पा बालगोंड यांनी हा अनोखा प्रयोग करून वाहवा तर मिळविली आहेच परंतु इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत प्रयोग देखील राबविला आहे. विजापुरात द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सर्वाधिक उष्ण आणि दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजापुरात तसे सफरचंदचे पीक अपवादच. मात्र ४ ते २१ डिग्री सेल्सियस आणि वार्षिक १०० ते १२४ सेंटीमीटर पाऊस अशी गरज असलेले हे पीक अशा भागात घेतले जाते म्हणजे हा प्रयोग नक्कीच उल्लेखनीय म्हणावा लागेल. या अनोख्या प्रयोगाबद्दल जाणून घेऊयात शेतकरी सिद्दप्पा बालगोंड यांच्याकडून.

भारतातील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, नागालँड मेघालय यासह दक्षिण भारतातील तामिळनाडू मधील निलगिरी बेटावर सफरचंद उत्पादन घेतले जाते. सर्वप्रथम कोल्हार येथील सिद्दप्पा बालगोंड या शेतकऱ्याने आपल्या शेतात प्रायोगिक तत्वावर सफरचंद पीक घेण्याचे ठरवले. एक एकरमध्ये ३०० सफरचंदाच्या झाडाची लागवड दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. आता प्रत्येक झाडापासून १० ते ३० सफरचंद काढले जातात. आणखी एका महिन्यात संपूर्णपणे या शेतात सफरचंदाला बहर येईल, असे सचिन बालगोंड या शेतकऱ्याने सांगितले.
हिमाच्छादित प्रदेशात घेतले जाणारे सफरचंद पीक विजापूरसारख्या अतिउष्ण भागात घेतले जाते हे ऐकायला नवलच आहे. काश्मीर खोऱ्यात घेतल्या जाणाऱ्या या पिकाचा प्रयोग प्रायोगिक तत्वावर करत उत्तम यश मिळविणाऱ्या सिद्दप्पा बालगोंड हा इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच आदर्शवत आणि अनुकरणीय ठरणारा आहे यात शंका नाही.


Recent Comments