बेळगावातील समर्थनगर येथे श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला शुक्रवारी भक्तिभावाने प्रारंभ झाला.
होय, पारायण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता श्रीरेणुका मंदिर समर्थनगर कॉर्नर येथुन दिंडीला सुरुवात झाली. यावेळी महिला डोक्यावर कलश घेऊन तर वारकरी टाळ-मृदंगाचा गजर करत मोठ्या भक्तिभावाने दिंडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दिंडीच्या मार्गावर सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
तसेच महिला व मुली भगवे फेटे परिधान करून या दिंडी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. समर्थनगरमध्ये प्रथमच या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा 23/4/22 ते 25/4/22 पर्यंत चालणार आहे. बेळगावकरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Recent Comments