Chikkodi

हुन्नरगीत समुदाय भवनासाठी भूमिपूजन

Share

 खासदार अण्णासाहेब जोल्ले मंत्री शशिकला जोल्ले यांनी हालूमत समाजाच्या लोकांची नेहमीच मदतीचा हात दिला आहे. हुन्नरगीतील हालसिद्धनाथ मंदिराजवळ समुदाय भवन बांधण्यासाठी आमदार निधीतून लाखांची मदत त्यांनी केली आहे असे भाजप ग्रामीण मंडळचे अध्यक्ष पवन पाटील यांनी सांगितले.

निप्पाणी विधानसभा मतदारसंघातील हुन्नरगी गावातील हालसिद्धनाथ मंदिराजवळ समुदाय भवनाच्या भूमिपूजन समारंभात बोलताना पवन पाटील म्हणाले, समुदाय भवनाचा वापर सामुदायिक उपक्रमांसाठी व्हायला हवा. आगामी काळात हालूमत समाजाच्या लोकांना कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जोल्ले दाम्पत्य सदैव तत्पर राहिल, असे ते म्हणाले.

यावेळी आशाज्योती मतिमंद विशेष विध्यार्थी शाळेचे अध्यक्ष ज्योतीप्रसन्न जोल्ले यांच्याहस्ते हालसिद्धनाथ मंदिराजवळ समुदाय भवन बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता सुतळे, उपाध्यक्ष मुन्शीलाल मुजावर, ग्रामपंचायत सदस्य महांतेश पाटील, विनोद मगदुम, उत्तम सुतळे, कल्लाप्पा नाईक, हालशुगर्सचे संचालक महादेवा बोते, राजू पाटील, राजू कुलकर्णी, धोंडीराम कांबळे, महादेव म्हातुकडे, नारायण सनदी, बिरा आरगे, रामा लवट्टे, हलप्पा लवटे, वासू रानगे, संजय रानगे, महालिंग आरगे, विश्वनाथ किल्लेदार, दत्ता किल्लेदार, भरमा हिरेकुडी, राजू रानगे, बाळू रानगे, सतीश किल्लेदार, पायगोडा पाटील, ठेकेदार अनिल दलाल आदींसह अनेकजण उपस्थित होते.

 

 

Tags: