Belagavi

रोटरी क्लबच्या जिल्हा क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

Share

 रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या वतीने बेळगावातील युनियन जिमखाना मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे शनिवारी समारंभपूर्वक उदघाटन करण्यात आले.

होय, रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे शनिवारी समारंभपूर्वक उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष अशोक नाईक, सचिव संतोष हत्तरकी, माजी गव्हर्नर अविनाश पोतदार, जिल्हा क्रीडा प्रभारी महेश अनगोळकर, स्पर्धा समिती अध्यक्ष डॉ. मनोज सुतार, सचिव वीरधवल उपाध्ये, विक्रम जैन, अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अशोक नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. मनोज सुतार यांनी क्रीडास्पर्धेची माहिती दिली. यावेळी बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन शरद पै यांच्याहस्ते तर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन अविनाश पोतदार यांच्याहस्ते यष्टीपूजनाने करण्यात आले. त्यानंतर क्रीडा महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. या क्रीडा महोत्सवात  क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ आदी क्रीडा प्रकारातील स्पर्धा होणार आहेत. जिल्ह्याच्या विविध ठिकाणच्या १००हुन अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.

Tags: