Kalaburgi

तरुणांचे भविष्य घडविण्यासाठी सरकारचे धाडसी पाऊल कौशल्य रथाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची ग्वाही

Share

कौशल्य रथाच्या माध्यमातून कर्नाटकातील तरुणांचे कल्याणकारी भविष्य घडविण्यासाठी सरकार एक धाडसी पाऊल उलचालत असून कल्याण कर्नाटक निर्मितीसाठी सरकार विशेष भर देत आहे. आगामी काळात प्रत्येक गावात कुशल युवकांच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती करण्यात येईल, याचप्रमाणे मोठ्या कंपन्यांमध्ये तरुणांना रोजगार देण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

कलबुर्गी येथे कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत स्किल्स व व्हील्स या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, भारतात मोठ्या प्रमाणात तरुण आहेत. ४६ टक्के तरुणांची संख्या असलेल्या आपल्या देशातील तरुणांचे भविष्य घडविण्यासाठी सरकार कौशल्य भारत अंतर्गत कार्यरत आहे. दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे केंद्र सरकारच्यावतीने कौशल्य विकास होत आहे. प्रत्येक वर्षी हजारो युवकांना विविध गोष्टींचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्मिती करण्यास हातभार लावण्यात येत आहे. युवकांना प्रेरणा, धाडस देण्याचे कार्य होत आहे. स्किल्स व व्हील्स उपक्रमांतर्गत तरुणांना सक्षम करण्याचे कार्य करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, तरुण आणि तरुणींसाठी इलेक्ट्रिशियन आणि ब्युटिशियन असे दोन कोर्स सुरु आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक ग्राम पंचायती अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योजना आखण्यात येत आहे. विशेषतः कर्नाटकात याची नितांत गरज आहे.ज्यांच्याकडे इलेक्ट्रिशियन आणि ब्युटिशियनच्या स्किल्स आहेत अशा युवकांची आणि युंवतींची सरकारला गरज असून यावर्षी दोन लाखांहून अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्याचे आपले उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास मंत्री डॉ. सी एन अश्वथनारायण, मुरुगेश निराणी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार दत्तात्रेय पाटील रेऊर, राजगौड, खासदार उमेश जाधव आदींसह अनेक अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Tags: