Kalaburgi

कलबुर्गी येथे भाजप कार्यकर्त्यांचा समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली आज कलबुर्गी येथे विभागवार भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

व्हॉइस : कलबुर्गी शहर, जिल्हा आणि कलबुर्गी ग्रामीण भागात बिदर यादगिरी यांच्यावतीने आज सकाळी एस एम पंडित रंगमंदिर येथे भाजप कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भुवनेश्वरी देवी पूजनाने करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक रणनीतीत महत्वपूर्ण ठरलेल्या प्रशांत किसुर यांचे कौतुक करत अशापद्धतीने निवडणूक लढवावी, कोणती रणनीती वापरावी याबद्दल प्रशांत किसुर यांचे तंत्राची त्यांनी प्रशंसा केली. अशाचपद्धतीने कार्यकर्त्यांचे सल्ले आणि सूचना घेऊन कार्यरत रहावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपने चार राज्यात बहुमत मिळविले. काँग्रेस पक्षाने एकाच ठिकाणी सत्ता मिळविली. मात्र काँग्रेस आता एकाच राज्यापुरता मर्यादित असून आगामी काळात काँग्रेस पूर्णपणे संपेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. भविष्यात काँग्रेस मोठा पराभव पत्करेल. भाजपकडून दलितांच्या उद्धारासाठी अनेक कार्यक्रम हाती घेण्यात येत असून प्रत्येक घरात भाजपासाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सिद्धरामय्या मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहात आहेत. मात्र आता मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने डीकेशी देखील पहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शत्रूला शह दिला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. कोरोनामुळे कोणीही उपाशी राहू नये, प्रत्येक गरजूला रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असून पंतप्रधानांनी एका वर्षात संपूर्ण भारतात लसीकरण पूर्ण करून जगासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री मुरुगेश निराणी, डॉ. सी एन अश्वथनारायण, बी श्रीरामुलू, आमदार दत्तात्रेय पाटील रेवूर, राजकुमार पाटील तेलकूर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, राज्य भाजप उपाध्यक्ष बी वाय विजयेंद्र, माजी आमदार सुनील येल्लापूरे यासह पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: