श्री शिवराज अष्टक मधील चौथे पुष्प “शेर शिवराज” या रुपात आज प्रदर्शित होत आहे. ज्या शिवछत्रपतींनी या भारताला हिंदुस्थान म्हणून जिवंत ठेवलं त्यांनी केलेला हा अद्वितीय पराक्रम मोठ्या पडद्यावर येत आहे.
बेळगांव शहरातील विविध चित्रपट गृहात हा चित्रपट प्रदर्शित होत असून आज फर्स्ट डे फर्स्ट डे पाहण्या साठी प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून येत आहेत . काही दिवसांपूर्वी शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ‘शेर शिवराज’ हा मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. यामुळे या चित्रपटाचे विशेष कौतुक केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेर शिवराज या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा या चित्रपटाचा ट्रेलर मूव्ही स्टुडिओ आणि यूएफओ मुव्हीज यांच्याबरोबरच मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्स प्रदर्शित झाला.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन केलं आहे. या संकल्पनेअंतर्गंत प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता या संकल्पनेतील पुढचा चित्रपट ‘शेर शिवराज’ आज २२ एप्रिल रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.’शेर शिवराज’ चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता यात दिसणार आहे. हा अभिनेता शेर शिवराजमध्ये अफझल खान ची भूमिका साकारणार आहे.



Recent Comments